देवळा प्रतिनिधी : येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्रअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुलचा विध्यार्थी दिव्येश सोमनाथ जगताप ( इयत्ता दहावी) याचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र देवळा यांचे मार्फत राष्ट्रीय हरित सेना देवळा तालुका अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पर्यावरण विषयावर चित्रकला व निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात राष्ट्रीय हरित सेनेच्या सर्व सर्व शाळांनी सहभाग नोंदवला. त्यातून बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा निकाल सोमवारी( दि २४ )रोजी घोषित करण्यात आला . अशी माहिती वनक्षेत्रपाल एस आर सोनवणे यांनी दिली .
निबंध स्पर्धा निकाल – प्रथम कु दिव्येश सोमनाथ जगताप ( वृक्षरोपण काळजी गरज , श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल ,देवळा ) ,द्वितीय – प्रियांका विठोबा आहेर (रुकमोती विद्यालय ,मटाने ),तृतीय -श्रद्धा दिलीप निकम (श्रीराम विद्यालय ,खुंटेवाडी ), उत्तेजनार्थ -साहिल विजय महाले (श्री शिवाजी ,देवळा ), पूनम नामदेव सोनवणे,( जिजामाता विद्यालय ,दहिवड)
चित्रकला स्पर्धा निकाल प्रथम – भूषण आहिरे (श्री शिवाजी देवळा ),द्वितीय -शिद्दी भारत गोसावी (श्रीराम विद्यालय ,खुंटेवाडी ), तृतीय – सुनील कहार (श्री शिवाजी ,देवळा ), उत्तेजनार्थ -तेजल आहेर ( रुकमोती विद्यालय ,मटाने ),ख़ुशी देवरे (जिजामाता विद्यालय ,दहिवड ) याप्रमाणे आहे .
बक्षीस पात्र विद्यार्थाना लवकरच सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी शिक्षक सुनील आहेर यांनी दिली .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम