दिलीप बांबळे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : सामाजीक क्षेत्रात हजरजबाबीने काम करणारे राम शिंदे यांचा जन्म इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे झाला.घरची परिस्थिती हातावरची असल्याने इयत्ता पाचवीला असतांना पासूनच गावातील एका हॉटेलवर मिळेल त्या फावल्या वेळात काम करत घरची परिस्थिती सांभाळत राम शिंदे यांनी गावातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद विद्यालयात १२ वी विज्ञात शाखेत उत्तीर्ण होऊन आर्थिक परिस्थितीमूळे एक वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा इगतपुरी येथील के.पी.जी महाविद्यालयात प्रथम श्रेणीत रसायन शास्रात बी.एस.सी पदवी संपादन केली.
विविध संगणक क्षेत्रातील कोर्स पूर्ण केले. लहानपणापासून राम शिंदे यांच्यात सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे गुण असल्याने शालेय जीवनात त्यांनी विद्यार्थ्यांना बस चालू करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न केला. कोरोनाच्या कालखंडात त्यांच्या शिक्षणात अडथळा आला असला तरी पुढील शिक्षण पूर्ण करणारच असा चंग त्यांनी बांधला आहे. सन २०१२ सालापासून त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. आदिवासी दुर्गम भाग असल्याने टाकेद गावांसह परिसरातील विविध वाड्या वस्त्या गावांचा तेथील ग्रामस्थ, नागरिकांचे ऐरणीवर असलेले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रस्ता, शिवार रस्ता, वीज, शिक्षण,आरोग्य, पर्यटन आदी प्रश्न स्थानिक प्रशासन स्तरावर पत्रव्यवहार करत प्रत्येक गोष्टींचा पाठपुरावा करत त्यांनी सोडवले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना शिंदे यांच्या सामाजिक कार्यामुळे सन २०१९ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक कार्याच्या जोरावर गावातील जनसामान्यांनी त्यांच्या आईंना चांगल्या मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्य देखील बनवले.
तालुक्याच्या पूर्व भागातील जवळपास चाळीस वाड्या वस्त्या आणि वीस पंचवीस ग्रामपंचायत असलेल्या परिसरासाठी आधार कार्ड सेंटर उपलब्ध करून आधारकार्ड कॅम्प लावणे,शिबिरामार्फत ऑनलाइन सुविधा,मतदान नोंदणी,कोविड लसीकरण शिबिर आयोजित केली,सेतू कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांसह गोरगरिबांचे विविध स्वरूपाचे दाखले,शासनाच्या विविधांगी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती आणि शेतकऱ्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी मदत केली. गावातील काँक्रीट रस्ते,पिण्याचे पाणी,भूमिगत ड्रेनेज,पाईपलाईन,सौर पथदीप,सार्वजनिक पाणीपुरवठा योजना,व्यायामशाळा,अभ्यासु विद्यार्थ्यांना वाचनालय सुविधा,आदिम कातकरी समाज बांधवांना शिधापत्रिका,सार्वजनिक शौचालय युनिट,आमदार खासदार निधीतून गाव परिसरासाठी विविध विकासकामे खेचून आणण्यासाठी व विकासकामे पूर्ण करण्यासाठी राम शिंदे यांनी आजपर्यंत पाठपुरावा केला आहे यातील अनेक कामे पूर्ण देखील झाली आहेत.
कोरोनाच्या काळात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पन्नास बेडचे कोविड सेंटर स्थानिक लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊन टाकेद याठिकाणी उभारले,अनेक गावांचा पाणी प्रश्न,रस्ता,वीज,प्रश्न, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवला, यासोबतच कोविड काळात अनेक रुग्णांना एस.एम.बी.टी रुग्णालयात ऑक्सिजन,व्हेंटिलेटर बेड सुविधा उपलब्ध करून दिली.गेल्या पाच वर्षात ग्रामीण भागातील बहुसंख्य रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन आणि रुग्णालयात मदत केली.
वीज वितरण विभागाकडून शेतकऱ्यांचे वीज मीटर, वाढीव लाईटबील, नवीन कनेक्शन, नवीन प्रस्ताव देऊन प्रश्न सोडवले,शेतकऱ्यांच्या पीक विमा सह नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न,परिसरात राष्ट्रीय कृत बँक सुविधा A T M सुविधा आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत,विविध सामाजिक संस्था, कंपनी, फाउंडेशनच्या माध्यमातून सी एस आर फंडातून शाळांमध्ये वृक्षारोपण करणे, दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप करणे,शालेय साहित्याचे वाटप करणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे,अनेक वाड्या वस्त्यांमध्ये कोविड काळात जीवनावश्यक वस्तूंचे किट,मास्क,सॅनिटायझर वाटप केले. अशी कामे त्यांनी आजवर सातत्याने केलीत,अनेक शाळांना ई learning किट देण्यासाठी,महाविद्यालय,कृषी मार्केट,बेरोजगार तुरूंनाना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी,स्पर्धा परीक्षा पुस्तके,मार्गदर्शन शिबिर भरविण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे,अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा संदर्भात असलेले प्रश्न त्यांनी सोडविले. बिबट्याच्या हल्ल्यातील कुटुंबांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रयत्न,आत्महत्या ग्रस्त,समाजघटकातील दलित, पीडित, वंचित, उपेक्षित, अपंग घटकांना शासनाच्या मार्फत विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला. आदिवासी बांधवांच्या खावटी अनुदानासाठी पाठपुरावा, महिला बचत गट तयार करण्यासाठी प्रयत्न,जेष्ठ नागरिक,निराधार ,विधवा महिलांना संजय गांधी,इंदिरा गांधी योजनेचा लाभ मिळवून दिला,सध्याचे इगतपुरी तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्फत अनेक गोरगरिबांना रेशनकार्ड मिळवून दिले,अनेकांच्या रेशनकार्ड समस्या सोडविल्या,राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यातून अनेक कुटुंबांना अर्थसहाय्य मिळवून दिले.स्थानिक स्तरावरील सर्वच सामाजिक समस्या सोडवण्यासाठी राम शिंदे यांचा कायम सहभाग असतो व मोलाचा वाटा आहे.
इगतपुरी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या विविध योजना शेतकरी वर्गाला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी मार्फत राम शिंदे यांनी आजवर पाठपुरावा केला आहे. कोणतेही शासकीय कार्यालय असो थेट तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी संबंधित शेतकरी बांधवांसोबत जात त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम आजवर राम शिंदे यांनी केले आहेत. गेल्या दहा वर्षात राम शिंदे यांनी परिसरातील समस्यांना तोंड देत टाकेद व परिसराच्या विकासासाठी अनेक प्रश्न सोडविले आणि तडीस देखील नेले आहेत. अपघात ग्रस्तांना घटनास्थळी मदत कार्य करून जखमींना रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पोहचविणे असे सामाजिक क्षेत्रात पुर्णपणे स्वतःला झोकून देत काम करत करत विविधांगी योजना आणि स्वतःच्या सामाजिक कार्यातील भन्नाट संकल्पना असलेला राम शिंदे नावाचा २७ वर्षीय तरुण केव्हा सामाजिक कार्यकर्ता झाला हे त्यांना देखील समजले नाही. सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यासाठी त्यांना अनेक अडथळे आले अनेकदा मोठा संघर्ष करावा लागला परंतु न हरता,न थकता,जिद्द,चिकाटी,आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गोरगरीब जनसमान्यांचे सामाजिक प्रश्न सोडविण्याचे कार्य राम शिंदे यांनी चालूच ठेवले आहेत.पाणी आडवा पाणी जिरवा,वृक्षलागवड,वृक्षतोड थांबवा,पशु पक्ष्यांचे संवर्धन,कोविड लसीकरण,मुक्या प्राण्यांचे गुरे वासरांचे लसीकरण, आधारकार्ड, कोरोनाचे नियम आणि उपपयोजना, कोविडमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत योजना,मतदान नोंदणी,लसीकरण,मुलगी शिकली प्रगती झाली,एक मूल सुंदर फूल, अश्या शासनाच्या विविध योजनांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचे काम देखील आजवर त्यांनी सामाजिक जाणिवेतून तळमळीने केले आहे.कोणतीही शासनाची योजना असो ती गोरगरिबांपर्यंत पोहचली पाहिजे असा त्यांचा कायम निस्वार्थपणे प्रामाणिकपणे प्रयत्न असतो.लेखणीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत सामाजिक कार्याची वेगळी वाट तुडवत निघाललेला हा वाटसरू पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा आहे.
आजच्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवक दिनानिमित्त त्यांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम