सांडपाणी नियोजन व कचऱ्या संदर्भात मुख्याधिकार्‍यांना निवेदन

0
40

नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : शहरातील हत्तीखाना येथे रस्ता व गटावर नसल्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे, यासाठी आज भारतीय जनता पार्टी आय टी सेल च्या वतीने निवेदन देण्यात आले.

गटारी नसल्यामुळे घरातले सांडपाणी व कचरा मोकळ्या ठिकाणी टाकले जाते यामुळे घाणीचे साम्राज्य होत असून आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात होतात व रोगराईला सामोरे जावे लागत आहे याकडे प्रशासनाने व चांदवड नगरपरिषदेने लक्ष द्यावे यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे आयटी सेलचे अध्यक्ष राहुल सुरेश जाधव यांनी निवेदन दिले यावेळी राहुल जाधव, निलेश पवार, पप्पू काका पवार, मंगेश जाधव, रोहित बेडवाल, हर्षद यशिकार,व इतर नागरिक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here