द पॉईंट नाऊ न्यूज ब्युरो : सध्याच्या घडीला सर्वात प्रसिद्ध आणि घराघरात संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वर चालणारी छोट्या पडद्यावरील मालिका तसेच टॉप 10 मध्ये सतत आपलं स्थान कायम ठेवणारी ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका होय . ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरला आहे. त्यांनतर आता मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होत आहे. पाहूया कोण आहे ही अभिनेत्री.
स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेची चांगलीच चर्चा असते. या मालिकेने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. प्रेक्षकांना नेहमीच या मालिकेबद्दल अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास अपडेट आणली आहे. या मालिकेत आता एका नव्या अभिनेत्री एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री सर्वांच्या ओळखीचीच आहे. कारण याआधीही तिने एका लोकप्रिय मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती
सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत ज्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ती दुसरी कुणी नसून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रेवती आहे. रेवती म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दाखविलेली राधिकाच्या अत्यंत जवळची मैत्रीण आणि तिची शेजारीण होय. ही भूमिका साकारली होती, अभिनेत्री श्वेता मेहेंदळेने. अर्थातच ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत श्वेता मेहेंदळेची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. श्वेता मेहेंदळे या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या अंजीच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. तिचा लुक नुकतंच समोर आला आहे. अभिनेत्री फार दिवसानंतर मालिकेत झळकणार आहे. त्यामुळे तिचे चाहते खुश आहेत.तसेच अभिनेत्रींच्या लेटेस्ट फोटोंमध्ये तिने वजन घटवल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम