सहकार संस्थामुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी – डॉ पवार

0
50
खर्डे येथे छत्रपती पतसंस्थेच्या मविप्र संचालक डॉ जयवंतराव पवार यांचा सत्कार करताना अध्यक्ष संदीप पवार समवेत माजी सरपंच नारायण जाधव,डॉ बापू सोनवणे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात देखील सहकारी संस्थांच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना आर्थिक सहाय्यातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होत असल्याने यवक स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत.

यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय सुरू करावा,असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ.जयंतराव पवार यांनी आज येथे केले. खर्डे ता देवळा येथील छत्रपती पतसंस्थेला डॉ जयवंतराव पवार यांनी सदिच्छा भेटी दिली . याप्रसंगी ते बोलत होते .यावेळी संस्थेतर्फे पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

खर्डे येथे छत्रपती पतसंस्थेच्या मविप्र संचालक डॉ जयवंतराव पवार यांचा सत्कार करताना अध्यक्ष संदीप पवार समवेत माजी सरपंच नारायण जाधव,डॉ बापू सोनवणे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

याप्रसंगी माजी सरपंच नारायण आण्णा जाधव, किसन आप्पा मोरे, सखाराम आण्णा जाधव, डॉ.बापूसाहेब सोनवणे, बबन गांगुर्डे, प्रहारचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे,हाँटेल दि आनंदचे संचालक प्रा. सुनिल (गुड्डू)आहेर, प्रा.राहुल देवरे ,आबा कुवर, सचिन गांगुर्डे,बबलू गांगुर्डे, आबा पवार, व्यवस्थापक अजय देवरे,रोशन थोरात आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here