सळई घेऊन जाणार ट्रक उलटला ; 13 जणांचा जागीच मृत्यू

0
31

बुलढाणा प्रतिनिधी : जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक उलटल्याने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

येथील दुसरबीड येथून समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. तळेगाव येथे हा ट्रक आल्यानंतर हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश बिहारी मजूर असल्याचे समोर येत आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातात काही मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here