देवळा प्रतिनिधी : नगरपंचायत निवडणूकीत वॉर्ड क्र 15 हे देखील लक्षवेधी ठरले. किशोर आहेर यांच्या इतक्या वर्षांच्या तपश्चर्येला यश आल्याने समाधान व्यक्त केलं गेलं. भाजपाशी एकनिष्ठ असलेले किशोर आहेर यांचे स्वप्न होते की आपल्या आईला नगरपंचायतिच्या सत्तेत बसवायचे त्यासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न व जनतेचे मिळालेले आशीर्वाद ह्या जमेची बाजू ठरल्या.
किशोर आहेर यांनी भाजपा पासून फारकत घेऊन दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घ्यावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र त्यांची पक्षावर असलेली निष्ठा अन नेत्यांवर असलेला विश्वास यामुळे ते कधीही डगमगले नाहीत. वेळप्रसंगी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला मात्र कुठल्याही पक्षाचा विचार केला नाही.
यावेळी नगरपंचायत साठी आपल्या मातोश्रीना उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात असतांना किशोर आहेर यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवत आपले काम सुरू ठेवले व शेवटच्या क्षणी टिकीत मिळाले. व त्यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कामांनी विजयश्री खेचून आणली.
एक सर्वसामान्य गृहिणी नगरपंचायतीत आपल्या प्रभागाचा विकासात्मक कारभार हाकणार असल्याने प्रभागातील सर्वसामान्य महिलांना आपले पणाची जाणीव झाली असून सामान्य व्यक्ती सत्तेत बसते तेव्हा प्रश्न लवकर मार्गी लागतील अशा अपेक्षा बळावल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम