समोस्यात झुरळ , प्रशासनाचे मात्र कागदी इशारे तक्रारीनंतरही स्वीटमार्ट सुरूच

0
47

देवळा प्रतिनिधी : समोसा प्रेमींसाठी धक्कादयक बातमी आहे, देवळा शहरातील कळवण रोडवरील निरंजन सोसायटीच्या शॉप नं-१ येथील कृष्णा सागर स्विट्समध्ये नाश्ता करत असताना समोस्यात झुरळ निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खवय्यांची नेहमीच गर्दी या ठिकाणी असते मात्र स्वच्छ तेचे तीन तेरा सर्वच स्वीट मार्ट मध्ये असल्याने अन्न व औषध प्रशासन अधिकारी आता तरी तालुक्यात फेरफटका मारणार का असा सवाल नागरिक करत आहे.

नाश्ता करण्यासाठी गेलेल्या संबंधित नागरिकांने जागरूकता दाखवत मोबाईलमध्ये चित्रीकरण करून देवळा नगरपंचायतीकडे संबंधित घटने संदर्भात तक्रार दाखल केली असून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र हा प्रकार घडूनही अद्याप हे स्वीट चालूच असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

खुंटेवाडी ता.देवळा येथील चेतन भामरे या युवकाने बुधवारी (दि.२७) देवळा शहरात असणाऱ्या कृष्णा सागर स्विट्समध्ये दुपारच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेला असता यावेळी समोसा खात असताना अचानक त्यामध्ये मेलेलं झुरळ निघालं. हे बघून त्याला किळस येऊन मळमळ सुरू झाली. हा गंभीर प्रकार संबंधित दुकानदाराला सांगितला यावेळी तुमचे पैसे वापस घेऊन घ्या असे सांगत दुकानदाराने विषय निपटवण्यासाठी आग्रह केला. यावेळी त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण करत दुकानदाराला जाब विचारला यादरम्यान नगरसेवक भूषण गांगुर्डे यांनी स्विट्स चालकाला स्वीट्सच्या परवान्याविषयी विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. यापूर्वी देखील असे गंभीर प्रकार घडले असुन जनतेच्या आरोग्याशी सर्रासपणे खेळ सुरु असून स्विट्स चालकाची बेफिकरी ग्राहकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबधीत स्विट्सवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक भूषण गांगुर्डे यांनी केली आहे.

देवळा नगरपंचायतीने तक्रारीची तात्काळ दखल घेत स्विट्सला नोटीस देत सदर ही बाब गंभीर असून त्याबाबत आपणावर योग्य ती कारवाई का करण्यात येऊ नये ? तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून त्याकामी परवानगी घेऊनच व्यवसाय चालु करावा. तोपर्यंत व्यवसाय बंद करावा अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले आहेत.

हा भयंकर प्रकार घडूनही नगरपंचायत प्रशासनाने नोटीस काढत कागदी घोडे नाचवले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून अद्यापही पथक आले नसल्याने हा विभाग सद्या कुठल्या मोहिमेवर आहे अशी चर्चा सर्वसामान्यतः रंगली आहे. प्रशासनाची उदासीनता मात्र कायमच चर्चेत असते. देवळा शहरात कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यास स्वच्छ तेचे वाटोळे च बघायला मिळेल अशी परिस्थिती आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here