द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (बागलाण) : सटाणा येथील सिद्धी अकॅडमी फॉर इंटिलीजन्स द्वारे दहावी साठीच्या घेण्यात आलेल्या दहावी मॉडेल परीक्षेच्या गुणपत्रिकांचे नुकतेच वितरण करण्यात आले.
दहावीच्या परिक्षांबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये काहीशी भीती निर्माण झालेली असते. त्यात कोरोनामुळे ऑफलाईन परीक्षा बंदच झाल्या होत्या. मात्र आता परीक्षा ऑफलाईन होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परिक्षांबाबत काहीशी भीती आणि दडपण निर्माण झालेले होते. हे दडपण आणि भीती दूर करण्याच्या दृष्टीने सिद्धी अकॅडमी फॉर इंटेलिजन्स द्वारे विशेष उपक्रम अंतर्गत ही मॉडेल परीक्षा घेण्यात आली.
सटाणा येथे घेण्यात आलेल्या या मॉडेल परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या परीक्षेच्याच गुणपत्रिकांचे नुकतेच वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्था व्यवस्थापक अमर रोहमारे, प्राचार्य युवराज गंगार्डे, डॉ. वेदांत सोनवणे, उपप्राचार्य गायत्री पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, गुणपत्रिका वाटप प्रसंगी या मॉडेल परीक्षेचा उद्देश गायत्री पाटील यांनी स्पष्ट केला. तर या परीक्षेतील गुणवंतांचे विशेष कौतुक करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम