सटाणा शहरात मोटरसायकल चोरीचे सत्र सुरूच

0
49

तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : गेल्या एक वर्षापासून बंद असलेले मोटरसायकल चोरीचे प्रकार सटाणा शहरात पुन्हा सुरू झाल्याने वाहन धारकांमध्ये भितीचे वातारन निर्माण झाले आहे.

गत सप्ताहात शुक्रवार दि. २६ | ११ | २o२१ रोजी सटाणा शहरातील रहीवासी रविंद्र अर्जून सोनवणे हे आपल्या मित्राच्या मुलीच्या साखरपुडयाच्या कार्यक्रमास भाक्षी रोडच्या सप्तपदी मंगल कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता हीरोहोंडा कंपणीची काळ्या रंगाची पॅशनप्रो मोटरसायकल (MH- 41 U 7000) मंगल कार्यालयाच्या बाहेर लावून कार्यक्रमास हजर होते. कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी तीन वाजता कार्यालयाच्या बाहेर आले असता त्यांना आपली मोटरसायकल मिळून आली नाही. तेथिल सीसी टीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात चोरटा स्पष्ट दिसत नाही.

यापुर्वी सटाणा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत त्यांचा अजून तपास लागलेला नाही. मध्यंतरीच्या काळात काही चोरटे सापडले त्यांच्याकडून काही गाडया मिळाल्या त्यानंतर काही काळ गाडी चोरीचे प्रमाण बंद होते. पोलीसांचा वचक कमी झाला की काय म्हणून चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे सदर घटनेवरून स्पष्ट होते .

या घटनेबाबद सटाणा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७९नुसार गुन्हा नोंदण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष अनुमोलवार यांच्या मागदर्शनाखाली पीएसआय वर्षा जाधव याकरीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here