तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : सटाणा येथील नामपुर रोड लगत असणाऱ्या श्री कृष्ण नगरातील शांताई निवासात राहणारे राजेंद्र अहिरे यांच्या घराचा दरवाजा तोडत अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद सटाणा पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
श्री कृष्ण नगरात वास्त्व्यास असलेले राजेंद्र अहिरे नवापूर येथे आगार व्यवस्थापक असल्याने (दि.११)नोव्हेंबर रोजी नोकरीनिमित्ताने गेले .मात्र त्यातच एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने ते नवापूर येथे आपल्या कृटुंबियांसह वास्तव्य करीत होते. अहिरे गुरुवार(दि.९)डिसेंबर रोजी घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा तोडलेला आढळून आला. घरातील कपाट तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील ७४ ग्रम वजनाचे सोने, चादीच्या साखळ्या ,कडे व रोख रक्कम दोन हजार असा सुमारे तीन लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम