सटाणा येथे २ ऑक्टोबर ला सरपंच परिषद

0
34

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सटाणा येथे उद्या दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सरपंच परिषद पार पडणार आहे. ज्यात तालुक्यातील सर्व सरपंच उपस्थित राहणार आहेत.

या सरपंच परिषदेचे नियोजन मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होते.

सटाणा येथील आश्रय फाउंडेशन आणि ग्रामसंघ या संस्थांच्या वतीने ही सरपंच परिषद आयोजित करण्यात आली आहे. आश्रय फाउंडेशन चे वैभव गांगुर्डे आणि ग्रामसंघ चे नंदकिशोर शेवाळे यांनी या सरपंच परिषदेचे आयोजन केले आहे.

सरपंच परिषदेचे उदघाटन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे, स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष सुनील मोरे राहणार आहेत. खासदार सुभाष भामरे, माजी आमदार दीपिका चव्हाण, जि. प. सदस्य यतीन पगार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रांत अधिकारी बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या सरपंच परिषदेत एकदिवसीय कार्यशाळा पार पडत असून, मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. यात माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, पुणे जि. प. सदस्य शरद पाटील, आदर्श गाव पाटोदा चे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यक्रमात तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींना आयोजकांच्या वतीने ग्रामसंसद पुरस्कार देखील दिला जाणार आहे.
सटाणा येथे पार पडणाऱ्या या सरपंच परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here