सटाणा – देवळा – मंगरूळ महामार्गाच्या कामासाठी केंद्राकडून ४२८.८० कोटी रुपये मंजूर ; आ डॉ राहुल आहेर

0
15

सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना . डॉ . भारती पवार यांच्या माध्यमातून आ . डॉ . राहुल आहेर यांनी केलेल्या पाठपुराव्यातुन सटाणा – देवळा – मंगरूळ महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना नितीन गडकरी यांनी ४२८.८० कोटीची दिली मंजुरी दिल्याची माहिती आमदार डॉ राहुल आहेर यांनी दिली .

केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांनी सटाणा देवळा रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्याबद्दल सत्कार करताना ना डॉ भारती पवार,आमदार डॉ राहुल आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

चांदवड देवळा मतदारसंघातील सटाणा – देवळा, मंगरूळ -चांदवड ,मनमाड -येवला, कोपरगाव या एन . एच ७५२ जी राष्ट्रीय महामार्गामधील चांदवड ते मनमाड ह्या लांबीतील रस्त्याच्या कामास २०१ ९ मध्ये मंजुरी मिळाली असून ,काम प्रगतीपथावर असतांनाच एन . एच ७५२ जी ह्या राष्ट्रीय महामार्गातीलच सटाणा – देवळा – मंगरूळ या उर्वरित लांबीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याबाबतची व सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याची बाब मागील वर्षी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आ . डॉ . राहुल आहेर यांनी आणून दिली होती .

यासंदर्भात ना गडकरी यांनी सदर रस्त्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडून माहिती घेत लवकरच रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासित केल्यानंतर आ . डॉ . राहुल द आहेर यांनी तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना . डॉ . भारती पवार यांनी देखील याकामी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना . नितीन गडकरी यांनी सटाणा ते मंगरूळ या ३७. १४ किमी रस्त्याच्या कामास ४२८.८० कोटी रुपयांची मंजुरी दिली असून, यामध्ये सटाणा ते देवळा या २०. १२ किमी लांबीचा व देवळा ते मंगरूळ ह्या १७.०२ किमी लांबीचे काम होणार असून संपूर्ण लांबीत सिमेंट काँक्रीट रस्ता होणार असल्याची माहिती शेवटी आ . डॉ . राहुल आहेर यांनी दिली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here