द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (बागलाण) : सटाणा येथे 3 एप्रिल रोजी झालेल्या हत्या प्रकरणात आरोपीला सटाणा पोलिसांनी अटक केली आहे. कंधाना फाटा येथे झालेल्या या हत्या प्रकरणातील आरोपी कंधाना फाटा परिसरातच राहत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, 3 एप्रिल रोजी कंधाना फाटा येथे एका 45 वर्षीय घमजी रंगनाथ माळी या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. मृत घमजी रंगनाथ माळी हे मूळ पिंगळवाडे येथील राहणारे व सध्या मोरेनगर येथे राहत होते.
या घटनेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिसांनी तपास केला असता, हिरामण नामदेव पगार याचे नाव समोर आले. हिरामण पगार हा बागलाण तालुक्यातील मळगाव येथील मूळ राहणार असून, तो सध्या कंधाना फाटा येथे राहत होता. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच हिरामण पगार याने घमजी माळी याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केल्याचे कबूल केले आहे. दरम्यान, सटाणा पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम