सचिन वाझे प्रकरणात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह दोन मंत्र्यांची नावे

0
29

द पॉईंट नाऊ ब्युरो : मुंबईचे निलंबित पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर आरोप केला आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यास पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.

परमबीर सिंह यांच्या या थेट मुख्यमंत्र्यांवरील आरोपांनी खळबळ उडाली आहे. दरम्यान मंत्री अनिल परब हे बदल्यांच्या याद्या घेऊन येत होते. असाही आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

परमबीर सिंह यांच्या या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here