जळगाव मध्ये दाखल झालेला गांजा अन गुजरात मध्ये ड्रग्ज जप्त; यंत्रणेच्या नाकावर टिच्चून झाला होता दाखल..

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ; अमली पदार्थ हा विषय सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्यात नुकतेच जळगाव येथे 1500 किलो गांजा आणि गुजरात मध्ये 120 किलो ड्रग्ज जप्त झाल्याचं वृत्त आहे.

सध्याच्या या घडीला सध्या अमली पदार्थांचं जाळं मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्याचं दिसत आहे.

ज्यात नुकतेच घडलेले अभिनेता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान चे प्रकरण असेल अथवा मग सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाहेर निघालेला अमली पदार्थांचा विषय.

मागील 2 वर्षांत अमली पदार्थ प्रकरणे मोठ्या प्रमाणावर बाहेर आल्याने, अमली पदार्थांच्या जाळ्या संदर्भात पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे? असा सवाल उपस्थित होतोय.

अमली पदार्थांचे पेव मोठ्या प्रमाणावर सिने सृष्टीत फुटल्याचे दिसून आले. अर्थात, सिने सृष्टीतील अनेक संबंधितांना या संदर्भातील कारवाईस सामोरे जावे लागले.

ड्रग्ज सारखा विषय सिने सृष्टीत अगदी सहजरित्या चघळला जाताना दिसून येत आहे. सिने सृष्टीतील कलावंत आणि इतर मंडळींना या विषयात इतका रस कसा आणि का? हा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

गुजरात मध्ये सुमारे 600 कोटींचे 120 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. यात चार जणांना अटक करण्यात आल्यानंतर, याचं कनेक्शन थेट पाकिस्तान मध्ये असल्याचं बोललं जातंय.

पाकिस्तानातून भारतात हे ड्रग्ज येतेच कसे? सुरक्षा व्यवस्था याबाबत अनभिज्ञ कशी? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

तर जळगाव येथे सुमारे 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश इथून हा गांजा जळगाव मार्गे महाराष्ट्रात विक्री साठी आल्याचं बोललं जात आहे.

एन. सी. बी. द्वारे सध्या मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उगारला जाऊन, मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ प्रकरणे समोर येत आहेत.

जळगाव मधील आणि गुजरात मधील या नवीन प्रकरणांमुळे अजून काही धागे – दोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगाव मध्ये एरंडोल येथे ही कारवाई करण्यात येऊन 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला.

एन. सी. बी. पथकाला मिळालेल्या माहिती नुसार, जळगाव मध्ये ही कारवाई करण्यात येऊन, एका ट्रक मधून हा गांजा जप्त करण्यात आला.

तर गुजरात मध्ये पकडण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे धागे – दोरे हे पाकिस्तान मधील ड्रग्ज माफिया खालिद बख्तशी जोडले जात असल्याचं, सांगण्यात येत आहे.

या प्रकारे हे अमली पदार्थांचे धागे – दोरे बाहेर नेत असल्याने, मोठ्या रॅकेट बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here