कोल्हापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोठं वक्तव्य केले आहे. येत्या ३ मे रोजी माझ्या खासदारकीचा कार्यकाळ संपतो आहे. ३ मे नंतर मी माझी राजकीय दिशा स्पष्ट करेन, ती नक्कीच वेगळी असेल. खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर संभाजीराजे भाजपत प्रवेश करणार, सेना-राष्ट्रवादीकडे जाणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडतंय. यावेळी संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे गेली सहा वर्षे मी काेणाचा ही प्रचार केलेला नाही. येत्या तीन मे राेजी माझा कार्यकाल संपत आहे. सरकारनं जे काही आश्वासन दिले हाेते. ते सर्वच पुर्ण झाले नाही हे मी मान्य करताे. त्याचा पाठपूरावा सुरु आहे. सरकारनं शब्द दिला आहे काही गाेष्टींची पुर्तता करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मी माझी भुमिका पार पाडली आहे. सरकार आणि विराेधी पक्ष यांनी ठरवावे काय मार्गी लावायचे आणि काय नाही. माझा एकच हेतू हाेता गरीबांचे कल्याण व्हावे.
दरम्यान काेल्हापूरच्या पाेटनिवडणुकीत राजकीय पक्षांच्या माध्यमातून पैशांचे वाटप झाले या प्रश्नावर खासदार संभाजीराजे म्हणाले पैसे वाटणे हे गैर आहे. चुकीच्या मार्गाने निवडणुका हाेऊ नयेत अशी माझी भुमिका आहे. त्यामुळेच अन्य राज्यकीय पुढा-यांपेक्षा मी वेगळा आहे असेही खासदार संभाजीराजेंनी नमूद केले. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय. संभाजीराजे छत्रपती यांनी मतदानाचा अधिकार बजावला. जवळपास ३० सेकंद विचार करुन मी कुठे मदतान करायचा हा निर्णय घेतलं, असं संभाजीराजेंनी सांगितलं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम