द पॉईंट नाऊ ब्युरो : एस. टी. महामंडळाच्या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नसल्याने सर्वांनी कामावर हजर राहावे असे न्यायालयाने म्हटले आहे.
संप करणाऱ्या एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांना न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. 15 एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे अन्यथा, कायद्याने संबंधित कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा राज्य सरकारचा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे.
मागील 5 महिन्यांहून अधिक काळापासून एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ज्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने अनेक वेळा या कर्मचाऱ्यांना आवाहन केले. मात्र तरी देखील हे संप करणारे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. आता न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर संप करणारे कर्मचारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम