स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे संत शिरोमणी सावता महाराज विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन कार्यक्रम प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडला. हरिनामाचा गजरामुळे भक्तिमय वातावरणाने संपूर्ण गाव तल्लीन झालो होतो. प्रत्येक घरासमोर व संपूर्ण गावात रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी पहिल्या दिवशी संपूर्ण गावातून पारंपारिक पद्धतीने अकरा बैलजोड्या असलेला मांडव, संत शिरोमणी सावता महाराज विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. बँड पथकावर महिला आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक आदींनी ठेका धरला होता.
प्रत्येक घरा समोर मूर्तींचे औक्षण करून श्रीफळ वाढवण्यात आले. नाशिक येथील पुरोहित यांच्या हस्ते तीन दिवस गावातील १० दाम्पत्यांच्या असते मूर्तींचे विविध मंत्र उच्चारात व विविध नद्या तील जलअभिषेक आणून, संपूर्ण विधिवत पूजा करण्यात आली. १३ फेब्रुवारी रोजी विश्वेश्वरनंदगिरीजी महाराज, नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा आलेले संत सावता महाराजांचे 16 वे वंशज क्षेत्र अरण भेंडी ह.भ.प. रमेश महाराज यांच्या शुभहस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून कलश रोहन करण्यात आला, त्यानंतर होमहवन , आरती, प्रवचन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी बागलानचे आमदार दिलीप बोरसे बारा बलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष बंडूकाका बच्छाव, सटाणा नगराध्यक्ष सुनील मोरे, जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे, पंचायत समिती उपसभापती ज्योती आहिरे, डॉ. दौलतराव गांगुर्डे, आदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक ,धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीराम भजनी मंडळ, ग्रामपंचायत, परिसरातील ग्रामस्थांचे, युवा कार्यकर्त्यांचे, महिलांची विशेष सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम