द पॉईंट नाऊ ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवसस्थानावर संप करणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी चपला फेकून मारल्याने वाद उभा राहिला आहे.
संपकरी एस. टी. कर्मचारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देखील मागे हटण्यास तयार नाहीत. शरद पवारांनीच एस. टी. ची दुरावस्था केली, अशी संतप्त प्रतिक्रिया संपकरी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान राज्य सरकारने आधीच एस. टी. महामंडळाचे विलीनीकरण होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने देखील संप करणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना 22 तारखेपर्यंत कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले.
मात्र या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा हा निर्णयच मान्य नसल्याचे म्हणत, शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानाबाहेर निदर्शने करत चप्पलफेक आणि दगडफेक केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी घराबाहेर येऊन संपकरी कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र कर्मचारी ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते.
शरद पवारांच्याच घरावर चप्पलफेक आणि दगडफेक झाल्याच्या या प्रकारामुळे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम