देवळा प्रतिनिधी : मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीसोबतच लसीकरणाच्या जोरावर कोरोनापासून बचाव शक्य असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्यधिकारी डॉ सुधीर पाटील यांनी केले .
देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये ” जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिंचा” अभियानांतर्गत शालेय आरोग्य तपासणी व कोविड लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी ते बोलत होते . लसीकरणापासून एकही पात्र लाभार्थी सुटता कामा नये यासाठी शाळेने सहकार्य करावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. आरोग्य विभागाला
लसीकरणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी ग्वाही मुख्याध्यापक डी ई आहेर यांनी दिली . यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली कुवर , विस्तार अधिकारी राजेश निकुंभ,सुरेश सोनजे,किशोर सोनवणे,सचिन झोडगे,प्रतिभा सूर्यवंशी आदींसह आरोग्य सेवक,सेविका ,आशा वर्कर अर्चना शार्दूल,संजीवनी केदारे,संगीता निकम , मनीषा कांबळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक ए के आहेर, समुपदेशक सुनील आहेर,कला शिक्षक भारत पवार, भास्कर सोनवणे उपस्थित होते . सूत्रसंचालन डी वाय भदाणे यांनी केले तर आभार एस टी पाटील यांनी मानले.
विद्यालयात लसीकरणासाठी १५ ते १८ वयोगटातील इयत्ता ९ वी व १० वीच्या १९७ पैकी १४८ विध्यार्थ्यांना लस देण्यात आली असून, उर्वरित विद्यार्थ्यानी लसीकरण करून घ्यावे ,
– डी इ आहेर ,मुख्याध्यापक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम