नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा दिन विद्यालयात विविध उपक्रम घेवुन साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य डॉ सौ संगीता आर बाफना यांनी दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य श्री एस यु समदडिया यांनी महात्माजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच विद्यालयातील विद्यार्थी आर्यन वाघ या विद्यार्थ्याने महात्मा गांधी यांचे वेशभूषा करून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यालयातील संगीत शिक्षिका सौ संगीता चव्हाण यांनी महात्मा गांधीजींच्या भजनाचे गायन केले विद्यालयातील उपशिक्षक हंसराज मोरे यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्या नंतर विद्यालयातील सर्व घटकांनी मिळून विद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मनोज उपाध्ये यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम