श्री गणेशाचे हे रूप तुम्ही एकदा बघाच ; कादंबरी चौधरीने रेखाटलेले चित्र

0
188
कादंबरी चौधरी हिने रेखाटलेले मनमोहन चित्र

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; श्री गणपती ही विद्येची देवता व संकटांचे निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी श्री “गणेशाय नमः” म्हणून श्री गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा भारतीय संस्कृतीत प्रघात आहे.

 

कादंबरी चौधरी हिने रेखाटलेले मनमोहन चित्र

त्याच प्रमाणे अध्ययनाच्या प्रारंभी सुद्धा श्री गणेशाची प्रार्थना करतात भारतीय संस्कृतीतील सुमारे 64 कलांचा धनी म्हणून गणपतीचे अत्यंत मानाचे स्थान आहे. अशाच ह्या महागणपतीची चित्ररूपी प्रतिमा कादंबरी चौधरी हिने साकारली असून अत्यंत सुंदर व बोलके रेखाटन तिने केले आहे. गणपतीच्या डोळ्यातील भाव तर मनाला स्पर्शून जातो व श्री गणेशाचा आशीर्वाद देताना चा हात बघितल्यानंतर साक्षात आशीर्वाद दिल्याचा भास होतो…!

हे मोठ्या आकारातील चित्र Oil मीडियम मध्ये साकारले आहे, तसेच कादंबरीच्या चित्राचे सर्वत्र कौतुक होत असून दुबईच्या एका गणेशप्रेमी व्यक्तीने खास हे चित्र मागवून घेतले आहे. कादंबरी ने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर ही हे चित्र टाकले आहे अणि या सोबत तिच्या सर्वच चित्रांना कला रसिकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here