देवळा प्रतिनिधी : शहरातील श्रीकृष्ण क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मागील तीन वर्षांची परंपरा जपत यावर्षीही एमएचटी-सीईटी परिक्षेत उत्तम यश मिळविले आहे. याच धर्तीवर यशस्वी विद्यार्थिनीं संस्कृती देवरे ,कल्याणी आहेर यांचा आज सत्कार करण्यात आला.
श्रीकृष्ण क्लासेसचे संचालक निलेश खैरनार यांनी माहिती देताना सांगितले की, क्लासेस मध्ये मिळत असलेल्या शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे व शिक्षणामुळे विद्यार्थी मागील तीन वर्षापासून भरघोस गुण मिळवत आहेत.
एमएचटी-सीईटी परिक्षेत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. क्लास मधील संस्कृती देवरे या विद्यार्थिनीने ९८.०२ % मिळवले असून ती तालुक्यात प्रथम आहे. तसेच कल्याणी आहेर या विद्यार्थिनीने ९१.५७ % मिळवत उत्तम यश प्राप्त केले. क्लासेसच्या इतर विद्यार्थ्यांनीही उत्तम गुण मिळवत यशस्वी कामगिरी केली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री क्रिष्णा क्लासेसचे संचालक निलेश खैरनार यांनी तसेच मनोज कपाते, मंजुषा आहेर, दर्शना चितळे यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम