श्रीनित आहेर ‘एनडीए’ साठी पात्र ; देशातून 298 वा क्रमांक पटकावला

0
62
देवळा : येथील श्रीनित आहेर याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत निवड झाल्याचा आनंद साजरा करतांना आई-वडील, आजी-आजोबा व पेढा भरवतांना बहीण श्रुती.(छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्य कायम ठेवत देवळा येथील श्रीनित देविदास आहेर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नेव्हल अकादमीच्या सर्व परिक्षांत पात्र होत संपूर्ण देशातून २९८ वे स्थान पटकावले. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

देवळा : येथील श्रीनित आहेर याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत निवड झाल्याचा आनंद साजरा करतांना आई-वडील, आजी-आजोबा व पेढा भरवतांना बहीण श्रुती.(छाया – सोमनाथ जगताप )

केंद्रीय लोकसेवा आयोगाने देशातील तिन्ही सैन्य दलासाठी सर्वोत्तम अधिकारी घडवणाऱ्या एनडीए च्या निकालाची नुकतीच (दि.२६) घोषणा केली. त्यात येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचा प्रथम वर्ष विज्ञान शाखेचा श्रीनित आहेर याची निवड झाली आहे.

देशपातळीवर एप्रिल आणि सप्टेंबर अशी दोनवेळा लेखी, तसेच मुलाखत आणि वैद्यकीयदृष्टया पात्र झाल्याने ४७८ विद्यार्थ्यांच्या यादीत कसमादे मधून तो एकमेव आहे. ४ सप्टेंबर २०२१ रोजी १४६ व्या एनडीए तुकडीसाठी खडकवासला(जि. पुणे) येथे तो दाखल होणार असल्याने घर, महाविद्यालय तसेच विविध संस्थाच्या वतीने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कळवण तालुक्यात कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक देविदास आहेर व योगिता आहेर यांचा तो मुलगा आहे.

श्रीनित याने प्राथमिक शिक्षण शारदादेवी ज्ञान विकास मंदिर, श्रीशिवाजी मराठा इंग्लिश स्कुल येथे तर माध्यमिक शिक्षण शरद पवार पब्लिक स्कुल मानूर येथे घेतले. औरंगाबाद येथील महाराष्ट्र शासनाची सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था यांचे व आईवडिलांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने सांगितले.

देशभरातून सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी एनडीए ची परीक्षा देतात. त्यातील केवळ ४७८ विद्यार्थी निवडले जातात. यांचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण व नंतर इंडियन मिलिटरी अकेडमी डेहराडूनचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय सैन्यदलात ‘लेफ्टनंट’ या अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती होत असते.

“ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य ठेवल्यास व शारीरिक आणि मानसिक दृष्टया आपण तंदुरुस्त असल्यास देशसेवा करण्यासाठी साहसी व उत्तम करिअर म्हणून तरुणांनी एनडीए ची निवड करावी. यामुळे भारतीय सैन्यदलात महाराष्ट्राची टक्केवारी वाढण्यास मदत होईल.”
– श्रीनित आहेर देवळा

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here