
देवळा प्रतिनिधी : राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळविलेली संस्कार मूल्ये विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची असून, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात समर्थ युवकांच्या सहभागातून देशापुढील नवीन आव्हाने सहज पेलने शक्य आहे. यासाठी विशेष श्रमसंस्कार शिबिरे फायदेशीर ठरतात. म्हणून या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन रामेश्वर येथील युवा उद्योजक व उपसरपंच विजय पगार यांनी केले.

देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन पगार यांच्या हस्ते दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.मागील आठ वर्षांपासून महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तकगाव रामेश्वर ता.देवळा येथे होत असून यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा अभियान या उपक्रमांतर्गत विविध कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.से.योजनेचे माजी विभाग समन्वयक व रसायनशास्त्र विभागाचे डॉ.सतीष ठाकरे होते. ०१ डिसेंबर ते ०७ डिसेंबर २०२१ दरम्यान संपन्न होणाऱ्या या शिबिरात रामेश्वर येथील डॉ.दौलतराव आहेर उद्यानातील जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती व स्वच्छता, स्मशानभूमी परिसर स्वच्छता, रामेश्वर गाव ते सहस्त्रलिंग देवस्थान रस्ता दुरुस्ती, देवस्थान परिसर व वनराई बंधारा दुरुस्ती,गाव सर्वेक्षण इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दुपारच्या सत्रात वैचारिक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व रासेयो नाशिक ज़िल्हा समन्वयक डॉ.डी.के.आहेर यांनी दिली. डॉ.आहेर यांनी मनोगतातून शिबिराची उद्दिष्टे,रूपरेषा समजावून सांगितली. कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बी.के. रौंदळ व गुजरे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय संबोधनात डॉ.ठाकरे यांनी रा.से.योजनेचा इतिहास, ध्येय,उद्दिष्टे सांगून स्वयंसेवकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रामेश्वर गावचे नितीन पगार , पोपट पगार, रघु पगार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व स्वागत स्वयंसेविका कु.मृणाल निकम व कु. स्वेता शिंदे यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ.जयमाला चंद्रात्रे, प्रा.राकेश घोडे, आर.एन.शिरसाठ, यु.के.शेळके,श्रीमती एन.वाय.पाटील,श्री बाबाजी आहेर, श्री संजीव आहेर व स्वयंसेवकांनी महत्त्वाचे योगदान दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम