देवळा प्रतिनिधी : देवळा तालुका रा.स्व. संघातर्फे देवळा येथे भारत मातेच्या पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमस्थळी नगरपंचायतीचे नगरसेवक व ग्रामस्थांनी भेट दिली, संघाचे प्रमोद शेवाळकर यांनी दरवर्षीप्रमाणे आज या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या वेळी दिलीप आहेर हे देखील कार्यक्रमात आल्याने एकच चर्चा सुरू झाली. निवडणुकीच्या वेळी दोघांमध्ये झालेली खडाजंगी जगजाहीर असतांना देशासाठी सर्व मतभेद दूर ठेवून एकत्र आल्याने नागरिकांना लोकशाहीचे अनोखे दर्शन झाले.
या कार्यक्रमाला संदीप भोळे,जितेंद्र आहेर, शामराव सूर्यवंशी, दिलीप आहेर, ललित मेतकर, योगेश वाघमारे, प्रदीप आहेर, जगणं आहेर, किशोर आहेर, आदींनी भेट दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम