शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – सचिव माणिक निकम

0
16
देवळा बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सचिव माणिक निकम समवेत उपसभापती शँकर निकम , चंद्रकांत आहेर, प्रदीप आहेर,जगदीश पवार आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा बाजार समितीमध्ये मंगळवार (दि २६) रोजी ‘अन्नदाता देवो भव , किसान भागिदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला .शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सचिव माणिक निकम यांनी केले . या मेळाव्यामध्ये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषि बाजार ( ई – नाम ) , देशात १० हजार एफ पी . ओ . , स्थापनेचा लक्ष्यांक , कृषि पणन सुविधा योजनाबाबत माहिती देण्यात आली .

देवळा बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सचिव माणिक निकम समवेत उपसभापती शँकर निकम , चंद्रकांत आहेर, प्रदीप आहेर,जगदीश पवार आदी (छाया – सोमनाथ जगताप )

ई – नाम अंतर्गत ई – लिलाव कार्यपध्दतीमुळे शेतमालाच्या विक्रीसाठी बाजार समितीमध्ये राबविण्यात येणा – या लिलाव पद्धतीमध्ये शेतमालाच्या आवकेची नोंद , ई – लिलाव प्रक्रिया , वजन , शेतकरी व इतर घटकांना अदा करावयाच्या रकमेबाबतची बिले तयार करणे , शेतकरी , आडते , बाजार समित्या यांना ई – पेमेंट द्वारे रक्कम अदा करणे , शेतमालाच्या जावकेची नोंद , इ . प्रक्रियेमध्ये देशात समानता , सुसुत्रता व पारदर्शकता आली आहे . ई – लिलाव कार्यपद्धती मध्ये शेतकरी , आडते , व्यापारी यांची संगणक प्रणालीमध्ये नोंद केली जाते , बाजार समितीत येणा – या शेतमालाची गेटवर प्रणाली मध्ये नोंद केली जाते .

शेतमालाची गुणवत्ता तपासून याबाबतचा अहवाल सदर प्रणाली मध्ये अपलोड केला जातो . प्रणालीद्वारे लॉट नंबर दिला जातो व लॉट स्लीप प्रिंट करुन एक प्रत शेतक – याला व एक प्रत लॉटवर दर्शविण्यासाठी दिली जाते . गेट ऐंट्री वेळी संगणक प्रणालीद्वारे तयार झालेल्या लॉट नंबर नुसार , लॉटची प्रत्यक्ष पहाणी करुन संगणक प्रणालीचा / मोबाईल अॅपचा वापर करुन खरेदीदारांकडुन ई – लिलावाची बोली लावली जाते . त्यानंतर संगणक प्रणाली मध्ये शेतमालाच्या वजनाची नोंद केली जाते व त्याप्रमाणे शेक – याला द्यावयाची रक्कम , बाजार फी व इतर देयके संगणक प्रणाली द्वारे त्वरीत तयार होतात . सदर देयकांची रक्कम ई – पेमेंट द्वारे संबंधितांच्या खात्यामध्ये जमा होते . तसेच शेतमालाच्या जावकेची नोंद संगणक प्रणाली द्वारे केली जाते . आदि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली . यावेळी उपसभापती शंकर निकम , संचालक चंद्रकांत आहेर , काकाजी शिंदे , प्रदीप आहेर , जगदीश पवार, रमेश मेतकर आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते . प्रास्ताविक सचिव माणिक निकम यांनी केले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here