सध्या महाराष्ट्रातील कांद्याच्या भावात खूप घसरण झाली आहे. शेतकऱ्याचा कांदा महाराष्ट्रात ६ ते ७ रुपये किलो दराने विकला जात असल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
कांद्याचे दर पाहता कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी
हवालदिल झाला असून व्यक्त करत आहे. परंतु इतर राज्यातही प्र कांद्याला चांगला दर मिळत आहे. बिहारची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या अगदी उलट आहे.
देशाच्या एकूण कांदा उत्पादनात बिहारचा वाटा ५.६१ टक्के आहे. कांद्याचा किमान भाव 1000 ते 1600 रुपये आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला इतका दर मिळत नाही.
उत्तर प्रदेशातील शेतकरीला महाराष्ट्रापेक्षा चांगला कांद्याला भाव मिळत आहे. दुसरीकडे, केरळ येथील बाजारात भाव 4500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर मंडईत कांद्याला सर्वात कमी भाव ३०० रुपये प्रतिक्विंटल होता. अशा परिस्थितीत उत्पन्न दुप्पट कसे होणार, असा सवाल शेतकरी सरकारला करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम