शिवसेनेना महिला आघाडीच्या देवळा तालुका संघटक पदी ज्योती थोरात यांना नियुक्तीपत्र देतांना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख स्नेहलता मांडे आदी (छाया – सोमनाथ जगताप )
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यात सध्या भाजपा वगळता बाकी पक्ष नावारूपास उरल्याची परिस्थिती आहे. राष्ट्रवादी पक्ष ग्रामीण भागात आपले अस्तित्व टिकवून आहे. मात्र आता शिवसेना आपली कात टाकायला सुरवात करतेय आज याचाच भाग म्हणून महिला आघाडी आघाडीच्या नियुक्त्या केल्या आहेत, ह्या नियुक्त्या मात्र सर्व्यांच्या जबाबदारी वाढवणाऱ्या आहेत.
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते खा. संजय राऊत ,उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर ,नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख .भाऊसाहेब चौधरी ,महिला आघाडी दिंडोरी संपर्क प्रमुख .स्नेहलता मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिलाआघाडीच्या ऊपजिल्हा संघटकपदी अर्चना पुरकर ,तालुका संघटक पदी रोशनी कुंभार्डे(निचित) , देवळा तालुका संघटक पदी ज्योती थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख,सुनील पाटील, आमदार सुहासआण्णा कांदे, महिला जिल्हा संघटक मंगलाताई भास्कर,भारतीताई जाधव, उपजिल्हा प्रमुख नितीन आहेर, देवानंद वाघ, चांदवड तालुकाप्रमुख विलास भवर, देवळा तालुकाप्रमुख सुनील पवार,तालुका संघटक केशव ठाकरे, बापू जाधव, घमाजी राजे सोनवणे, ज्ञानेश्वर आवारे आदींनी अभिनंदन केले आहे. दरम्यान ,नवनियुक्त पदाधिका-यानी दोन्ही तालुक्यात शिवसेना महिला आघाडीची शिवसेनेच्या बरोबरीने भक्कम फळी ऊभी करून आगामी
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकविण्या कामी परिश्रम घेणार असल्याचे सांगितले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा