शिवसेनेच्या अजून एका नेत्याला झटका; 41 मालमत्ता आयकर विभागाने केल्या जप्त

0
31

द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेना नेते यशवंत जाधव यांची मोठी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे. जाधव यांच्या 41 मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत.

यशवंत जाधव यांचे भायखळा येथील 31 फ्लॅट, आणि वांद्रा येथील 5 कोटींच्या फ्लॅटवर आयकर विभागाने टाच आणली आहे. काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकत चौकशी केली होती. त्यातून निष्पन्न झालेल्या माहितीवरून आयकर विभागाने ही कारवाई करत त्यांच्या या 41 मालमत्ता जप्त केल्या आहेत.

या कारवाईने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. नुकतीच संजय राऊत यांची देखील संपत्ती जप्त करण्यात आली होती. आणि आता यशवंत जाधव यांच्या संपत्तीवर देखील आयकर विभागाने टाच टाकत ती जप्त केली. मागील काही दिवसांत झालेल्या या एकामागे एक कारवायांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहे. यामुळे चलबिचल सुरू असल्याचे दिसून येत आहे.

भाजप तपास यंत्रणांना हाताशी धरून सूडबुद्धीने या कारवाया करवून घेत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे. आता यशवंत जाधव यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here