शिवसेनेचे शहरप्रमुख आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

0
52
शिवसेनेचे देवळा शहर प्रमुख मनोज आहेर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना जिल्हा प्रमुख सुनील पाटील समवेत देवा वाघ ,सुनील पवार, ज्योती थोरात आदी

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; शिवसेनेचे येथील शहरप्रमुख मनोज आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

शिवसेनेचे देवळा शहर प्रमुख मनोज आहेर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना जिल्हा प्रमुख सुनील पाटील समवेत देवा वाघ ,सुनील पवार, ज्योती थोरात आदी(छाया – सोमनाथ जगताप )

शिवसेनेचे देवळा शहरप्रमुख मनोज आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी( दि ८) रोजी देवळा – खर्डे रस्त्यावरील मारुती मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबीर तसेच नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर सायंकाळी चार वाजता अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.

यावेळी मनोज आहेर यांचा शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .जिल्हा प्रमुख पाटील यांचे देवळा शहरात आगमन होताच तालुका शिवसेनेच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले . यावेळी सुनील पाटील यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख देवा वाघ, निलेश पाटील,कारभारी आहेर , अंबादास जाधव, डॉ प्रशांत सोनवणे ,दशरथ बच्छाव, योगेश पगार ,तालुका प्रमुख सुनील पवार ,महिला संघटक ज्योती थोरात , उप तालुका प्रमुख बापू जाधव , नंदू जाधव , विभागप्रमुख विजय जगताप , सतीश आहेर, भाऊसाहेब चव्हाण , देवा चव्हाण, विश्वनाथ गुंजाळ ,नाजीम तांबोळी, गुड्डू तांबोळी, समाधान शिंदे ,मोबिन शेख आदी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, भाऊसाहेब पगार , जितेंद्र आहेर ,उदयकुमार आहेर, युकॉचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर, दिलीप पाटील ,दीपक आहेर , संतोष शिंदे ,सचिन सूर्यवंशी आदींनी शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here