गैर व्यवहारावर कोणाचा वरदहस्त?

0
11

ताहाराबाद (रोहित गुरव) ; नाशिकच्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीचा कथित गैरव्यवहार चव्हाट्यावर येताना दिसून येतोय.

याच गैरव्यवहाराच्या, चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना तालूका प्रमुख सुभाष नंदन यांनी, थेट नाशिक जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

याबाबत वारंवार कळवून देखील, आजतागायत कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्याने, नंदन यांनी थेट निवेदन सादर करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

ताहाराबाद येथे ग्रुप ग्रामपंचायत आहे. आणि इथे आजवर वित्त आयोग, ग्रामविकास निधी यात मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार झाल्याचं नंदन यांनी म्हटलं आहे.

आजवर झालेल्या वेगवेगळ्या गैर व्यवहारांबाबत शासकीय अधिकाऱ्यांना सांगूनही, यावर आज पर्यंत कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत.

तसेच गैर व्यवहारात हात असलेल्यांनाच, सोबत घेऊन शासकीय अधिकाऱ्यांद्वारे चौकशी केली जाते. असा आरोप देखील नंदन यांनी केला आहे.

आजवर नंदन यांच्याद्वारे, वारंवार गैर व्यवहारांबाबत शासकीय अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा निवेदने दिली गेली.

तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधून, शासकीय अधिकाऱ्यांना पत्र देखील देण्यात आली.

मात्र तरी देखील शासकीय अधिकाऱ्यांद्वारे कोणत्याही प्रकारे लक्ष न देता, उडवा उडवीची उत्तरे दिली गेली. त्यामुळे या गैर व्यवहार करणाऱ्यांमागे कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल सुभाष नंदन यांनी उपस्थित केला आहे.

लवकरात लवकर ताहाराबाद इथल्या ग्रामपंचायत गैर व्यवहारांबाबत, ठोस पाऊले उचलली जावीत, यासाठी येत्या 23 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्हा परिषद येथे आत्मदहन करण्याचा इशारा नंदन यांनी दिला आहे.

ताहाराबाद इथल्या या गैर व्यवहारांमागे नेमकं कोण आहे? नेमका काय गैर व्यवहार? कोणाचा वरदहस्त? असे अनेक सवाल यामुळे उपस्थित होत आहेत.

राज्यात सरकार देखील शिवसेनेचे आहे. मात्र शिवसेनेचेच नेते असलेल्या, नंदन यांना आत्मदहनाचा इशारा का द्यावा लागतोय? असा सवाल उपस्थित होतो.

शिवसेनेचे सरकार असतांना, एका शिवसेना पदाधिकाऱ्याला आपल्याच गावाची व्यथा आपल्याच लोकांसमोर मांडण्यासाठी अशा प्रकारे पाऊल उचलावे लागते, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

माझ्या आत्मदहन करण्याने तरी इथला गैर व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा नंदन यांनी व्यक्त केली आहे.

आता नंदन यांनी दिलेल्या या इशाऱ्या नंतर याबाबत काय निर्णय घेतला जातो? नंदन यांनी केलेल्या गैर व्यवहार आरोपांबाबत चौकशी होणार का? आणि ती कधी? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here