द पॉईंट नाऊ ब्युरो : सांगली येथे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचेच पाकीट भामट्याने मारले. येथे झालेल्या एका OBC मेळाव्यादरम्यान संजय विभूते यांचे पाकीट चोराने लंपास केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली येथे सुरू असलेल्या OBC मेळाव्यादरम्यान विभूते हे सत्कारासाठी उभे राहिले. यादरम्यान चोरट्याने डाव साधत विभूते यांचे पाकीट चोरले. या पाकिटात 50 हजार रुपये होते, असा दावा विभूते यांनी केला आहे. यामुळे सर्वांचेच डोळे विस्फारले.
दरम्यान, याबाबत सांगली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. थेट सभेतच हे पाकीट चोरट्याने चोरल्याने, पोलिसांचे लक्ष कुठे होते किंवा मग चोरटे इतके धाडसी झालेत की एवढ्या पोलिसांच्या लवाजम्यात थेट सभेतच आणि तेही मोठ्या नेत्याच्याच पाकिटावर डल्ला मारल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले गेले. आणि यावर नवलही व्यक्त केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम