शिवसेनेची उमेदवारी रद्द ; संजय राऊत भडकले

0
39

द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेनेनं आपले उमेदवार राज्याबाहेर उभे केले आहेत. उत्तरप्रदेशातील शिवसेना (Shivsena) उमेदवाराचा उमेदवारी अर्ज उशिरा आला असल्याचं सांगत तो रद्द करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यावर शिवसेना चांगलीच भडकली असून भाजपाला फैलावर घेतले आहे.

तेथील जिल्हाधिकाऱ्यानी घेतलेल्या भुमिकेवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगले आक्रमक होऊन भडकले. “उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) काय चाललंय ? लोकशाही अस्तित्वात आहे का अस म्हणत उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेत दुपारी 2:30 वाजता सादर केला. त्याला निवडणूक अधिकाऱ्यांनीही मान्यता दिली होती.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेनंतर आता उमेदवारी अर्ज उशिरा आला असून तो रद्द केला जाईल, असं जिल्हाधिकारी उमेदवाराला सांगत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. अशा प्रकारची भाजपची खुशामत खपवून घेतली जाणार नाही असं संजय राऊत म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपाला फैलावर घेतले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here