द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : हिंदू महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनी शिवलिंगाबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना नेटकर्यानी धारेवर धरले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावनांना ठेच पोहचेल असे वक्तव्य केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले.
रतन लाल हे या प्राध्यपकाचे नाव आहे आणि ते दिल्लीतील हिंदी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांनी ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्राध्यापक रतन लाल यांनी मंगळवारी एक फोटो शेअर करत त्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली आहे. त्यातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शिवलिंगावरील त्यांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांनी पोलिसांना संरक्षण मागितले असल्याचे दिसून येते. माझी पोस्ट अचूक असून मला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही. मला नोटीस मिळाली तर मी त्यांना सहकार्य करेनच. मी कोणतही टीका केलेली नाही. मी माझं निरीक्षण वर्तवल आहे. आपल्या देशात कोणत्याही गोष्टीबद्दल बोललं की धार्मिक भावना दुखावल्या जातात, असं त्यांनी माध्यमासोबत बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी सोशल मीडियावर शिवलिंगाबाबत अशीच आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. विश्व हिंदू परिषदेने त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रँचनं दानिश कुरेशी यांना अटक केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम