MIM, TRS ची शिवरायांचा पुतळा हटवण्याची मागणी; तणावाच्या वातावरणाने कलम 144 लागू

0
10

द पॉईंट नाऊ ब्युरो : तेलंगणा मधील निझामाबाद जिल्ह्याच्या बोधन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या मागणीसाठी MIM आणि TRS पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निझामाबाद मधील बोधन नगरपालिकेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा शिवरायांचा पुतळा हटवण्याची मागणी MIM आणि TRS च्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यामुळे येथे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजप व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. यामुळे येथे कलम 144 लागू करण्यात आला आहे.

निझामाबाद येथे निर्माण झालेल्या या वादामुळे भाजपने सोमवारी बोधन बंदचे आवाहन केले आहे. शिवरायांचा पुतळा हटवण्याच्या मागणीने येथे मोठा तणाव निर्माण झाला असून, वातावरण अधिकच तापले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here