द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून सुरु केली आहे. या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक, ताजे भोजन मिळत आहे.
देवळा येथील शिवभोजन केंद्राला शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार यांनी भेट देऊन शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला . याठिकाणी गरीब व गरजू नागरिकांना ५ रुपयांत चांगल्याप्रकारे ताजे भोजन मिळत असून, लाभार्थ्यांचा ओघ बघता थाळीची संख्या वाढून मिळावी अशी मागणी यावेळी केंद्र चालकांनी तालुका अध्यक्ष सुनील पवार यांच्याकडे केली असून, याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना दिलासा द्यावा . अशी मागणी पवार यांनी केली आहे.
देवळा येथील शिवभोजन केंद्रावर थाळीचा आस्वाद घेतांना शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील पवार आदी (छाया – सोमनाथ जगताप )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम