द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार वेगवेगळ्या मान्यवरांना दिला जातो, या वर्षी ‘शिवनिश्चल पुरस्कार’ मावळचे पै. अनिकेत घुले यांना जाहीर करण्यात आला. यामुळे घुले यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा ५ सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत अनिकेत घुले यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष यशवंत गोसावी म्हणाले, अनिकेत घुले हे दरवर्षी शिवनेरी ते रायगड पालखी सोहळा आयोजित करून शिवकार्य तरुणपिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा व्यायामाकडे वळावे, हा संदेशही ते तरुणांना देत असतात.‘गाव तिथे शिवराय आणि भीमराय’ ही संकल्पना त्यांच्या माध्यमाने राबविण्यात येत असते.
सार्वजनिक कार्यक्रमात सत्कार करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती भेट करण्याचे आवाहन ते करतात. दान स्वरूपात मिळालेल्या मूर्ती गावातील तरुण मंडळांना भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.या माध्यमातून प्रत्येक गावात या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा, शिवशक्ती भीमशक्तीची एकजूट व्हावी, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. लॉकडाऊन, महापूरासारख्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची शिवनिश्चल पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांनी सांगितले.
या पुरस्कारामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षवा होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम