देवळा प्रतिनिधी : 73 वा प्रजासत्ताक दिन प्रत्येक भारतीयाने उत्साहात साजरा केला. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास असल्याने प्रत्येक जण विविध उपक्रम राबवत असतात. शितल अकॅडमी तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधान व अनेक विषयांबद्दल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते यशवंत गोसावी , देवरे मॅडम व विद्या भामरे उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? त्याचे महत्व काय ? भारतीय राज्यघटना, इत्यादी विषयी विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. प्रजासत्ताक दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे हा या स्पर्धेचा उद्देश होता. यावेळी स्पर्धेचे आयोजक प्रा. श्याम पाटील आणि अकॅडमीचे सहकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम