नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा चांदवड चे भव्य त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच दिनांक 5डिसेंबर रोजी रेणुका इव्हेंट हॉल मंगरुळ , चांदवड येथे पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आ. डॉ. राहुल आहेर व काळूजी बोरसे पाटील (राज्य नेते म.रा.प्राथ.शिक्षक समिती) यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. प्रमुख अतिथी डॉ. सयाजीराव गायकवाड (जि.प उपाध्यक्ष), डॉ. आत्माराम कुंभार्डे (जि. प.गटनेते), विलासकाका देवरे (मा.सभापती कृ.उ.बा.स. उमराणे), पुष्पाताई धाकराव, सभापती ( पं. स. चांदवड), शिवाजी सोनवणे, उपसभापती (पं. स. चांदवड), कविता ताई धाकराव( जि प सदस्या), शोभा ताई कडाळे( जि प सदस्या),
नितीन दादा आहेर (पं. स. सदस्य चांदवड), नितीन गांगुर्डे( पं. स. सदस्य चांदवड),श्री. केदुजी देशमाने ( राज्य कोषाध्यक्ष,म.रा.प्राथ.शिक्षक समिती ) पांडुरंग कर्डिले (राज्य उपाध्यक्ष) दादाजी सावंत (राज्य सल्लागार)आनंदा कांदळकर (जिल्हाध्यक्ष) प्रकाश सोनवणे (जिल्हा सरचिटणीस) भास्कर मोरे (जिल्हा कार्याध्यक्ष) साहेबराव पवार, नितीन देवरे (जिल्हा कोषाध्यक्ष) बुधेसिंग ठोके (जिल्हा उपाध्यक्ष) प्रकाश अहिरे(जिल्हा नेते) पी. के. अहिरे (जिल्हा कार्याध्यक्ष)बापू माळे,संजय मोरे (जिल्हा संघटक), किरण गांगुर्डे (तालुका नेते) तसेच सर्व तालुका शाखांचे सन्माननीय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.राहुल दादा आहेर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व कै. देवाजी नाना गांगुर्डे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने अधिवेशनाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले. यानंतर नितीन दादा आहेर, शिवाजी सोनवणे यांनी आपल्या भाषणात पंचायत समिती स्तरावरील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मा. श्री. डॉ.सयाजीराव गायकवाड व मा.श्री. डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी आपल्या भाषणात शिक्षकांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून शिक्षकांचे जि. प. स्तरावरील वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी यासह सर्व प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष काळूजी बोरसे पाटील, केदूजी देशमाने यांनी संघटनेच्या स्थापनेपासून संघटनेची आजतागायत चालू असलेली वाटचाल विषद केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नेहमी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी झटत असते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आ.श्री. डॉ. राहुल दादा आहेर यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत संघटनेच्या माध्यमातून शिक्षक समिती शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न नेहमी अग्रक्रमाने मांडत असल्याचे सांगितले तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चांदवड शाखेच्या नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका नेतेपदी शिवाजी शिंदे, तालुकाध्यक्षपदी श्रीकांत देवरे,सरचिटणीस पदी मुकुंद भोजने, उपाध्यक्षपदी संजय खांगळ,कार्याध्यक्षपदी किरण दाते, कोषाध्यक्षपदी सोपान बोरसे यांची तथा इतर पदाधिकाऱ्यांची निवड करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश आहेर, शितल सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन सोमनाथ पवार यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सभासद तथा तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम