द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आत्महत्या ह्या न त्या कारणाने सुरूच आहेत. शिक्षकाच्या (Teacher) त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या (Suicide in Kolhapur) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. शिक्षक तसा गुरू असतो मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकाने लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून 6 दिवसांपूर्वी विष (Poison) प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.
या युवतीवर उपचार सुरु असताना तिचा शुक्रवारी मृत्यू (Died) झाला असून. कागल तालुक्यातील अर्जुनवाडा (Arjunawada) येथे ही घटना घडली आहे. आकांक्षा तानाजी सातवेकर (Akanksha Tanaji Satvekar) (वय 19) असं मृत तरुणीचे नाव असून. मुरगूड पोलिसांनी (Murgud Police) संशयित शिक्षक आरोपी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक (Arrested) केली आहे. पोलीस पुढील तपास करत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमित कुंभार (रा. अर्जुनवाडा) हा कागल तालुक्यातील मुगळी येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याची नियत साफ नसल्याने आकांक्षाला फोन करून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्रास देत होता. गेल्या दीड महिन्यापासून तो वेगवेगळे msg करून त्रास देत असे. लग्नासाठी होकार दिला तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या सोबत विवाह करण्यास तयार होईन, असं म्हणत msg पाठवत होता. हे सर्व असह्य झाल्याने शेवटी मुलीने आत्महत्येचे पाऊल उचलले.
सततच्या त्रासाला कंटाळून आकांशाने (22 जानेवारी) रोजी आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. त्यानंतर तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू (Died) झाला असून. अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. यामुळे पुढील पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम