शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यावे : शहाजी राजोळे

0
30

निफाड वार्ताहर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातीलशाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणीक स्पर्धेत टिकण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. शालेय शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी राजोळे यांनी केले.

करंजगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी पालक मेळावा उत्साहात झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच प्रज्ञा नंदू निर्भवणे, उपसरपंच वर्षा किरण जाधव, गटनेते रावसाहेब पाटील राजोळे, माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, शिवसेनेचे गटप्रमुख सागर जाधव, जेष्ठ नेते बाळासाहेब पावशे, ग्रामपालिका सदस्य नामदेव पवार, रोहिदास कामडे, वासुदेव जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गांगुर्डे, उपाध्यक्ष योगेश राजोळे, सदस्य योगेश बोऱ्हाडे, राजेंद्र राजोळे, अनिल जोगदंड, नरहरी निर्भवणे, शंकर पवार, योगेश वलटे, शशिकांत राजोळे, छोटू डांगळे आदी उपस्थित होते.

यावेळी अतिथींच्या हस्ते प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. शाळेचे शिक्षक प्रभाकर राठोड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या डिजिटल वर्गासाठी खंडू बोडके-पाटील यांनी एकविसशे रूपये देणगी दिली. शिक्षक प्रभाकर राठोड व कल्पना बावकर मॅडम यांनी शाळेच्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी शहाजी राजोळे, सागर जाधव, खंडू बोडके-पाटील, योगेश राजोळे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

मेळाव्यास माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, न्यानेश्वर रोडे, शालेय समिती सदस्य योगेश चव्हाण, राजेंद्र वलटे, शरद गोतीस, योगेश पीठे, संदीप पीठे, सागर राजोळे, हेमंत दिघे, जि.प शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा चव्हाण मॅडम, डोंगरे सर, गोसावी मॅडम, गांगोडे सर, वाघले मॅडम, प्रभाकर राठोड सर, कल्पना बावकार मॅडम यांच्यासह रवींद्र पवार, युवराज कोटकर, देविदास मोरे, रामदास कोटकर, मुरली जोगदंड यांच्यासह अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. मेळाव्याचे सुत्रसंचालन प्रभाकर राठोड सर यांनी केले. प्रास्ताविक योगेश राजोळे यांनी तर आभार योगेश बोराडे यांनी मानले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here