दिलीप बांबळे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून जि.प.प्राथमिक शाळा टाकेद बुद्रुक ता .इगतपुरी जि.नाशिक येथे शासकीय आदेशानुसार शाळा सुरू करण्यात आली .शाळेच्या प्रवेश द्वारात विध्यार्थ्यांचे ऑक्सिमीटर , थर्मामीटरने तापमान ऑक्सिजन लेवल तपासणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला .
शाळेत सर्व शिक्षकांचे लसीकरण दोन्ही डोस झाले असून सर्व वर्गवार 94%उपस्थिती आहे,सर्वांनी मास्क हॅन्ड वॉश,सॅनिटायझर चा पुरेपूर वापर करत कोरोनाच्या हरवायचे आहे असे मुख्याध्यापक नवनाथ आढाव यांनी यावेळी सांगितले .यावेळी उपशिक्षक रामदास लोहकरे ,जगन्नाथ गांगड व उपशिक्षिका कल्पना गरुड व सोनाली नवले उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम