शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश ; राज्यसरकार कडून २१५ कोटींची निधी

0
7

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उशिराने मिळाला आणि तोही एकच. तरी कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले असल्याने १३ जून पासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २ गणवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी राज्यसरकार कडून सर्व जिल्ह्यांकरिता २१५ कोटींचा ५३ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यातून सोलापूर जिल्ह्याला ८ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने दोन गणवेश विनामूल्य दिले जातात. प्रत्येक मुलाच्या एक गणवेशासाठी ३०० असे ६०० रुपये दिले जातात. शाळा व्यस्थापन समितीच्या माध्यमातून गणवेशाचा रंग निश्चित केला जाणार आहे. तरी गणवेशाचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. गणवेश फाटला अथवा उसवला असता त्या साठी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीला जबाबदार धरले जाईल. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार ४०५ मुलांना गणवेश दिलं जाणार आहे.

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेला राज्य सरकारच्या वतीने गणवेश निधी देण्यात आला आहे. आता तो निधी तालुकास्तरावरून सर्व शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीला पाठविला जाईल. गणवेशचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे अशी सूचना शिक्षणाधिकारी किरण लाहोर यांनी केल्या आहेत. पुणे, पालघर जिल्ह्यांनंतर सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. मागच्या वर्षी मुलांना किती गणवेश मिळाले , एकच गणवेश का मिळाला ह्या सर्वांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागवली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने त्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांना सादर केली आहे. कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याने शासनाकडून एकाच गणवेशाचे पैसे आल्याने मुलांना एकच गणवेश दिल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here