शाळेची घंटा वाजणार ; शिक्षकांना दोन डोस बंधनकारक

0
13

नाशिक प्रतिनिधी : लवकरच राज्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे.कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने त्या दृष्टीने पाऊले उचलले जात आहेत. शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही ५ सप्टेंबर ची मुदत दिली आहे.यामुळे सध्या शिक्षकांची घाई सर्वत्र दिसून येतंय.

शासनाने प्रथम आठवी ते बारावी पर्यन्त शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. नाशिक महानरपालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्र वगळता जिल्ह्यात जवळपास ७० ते ८० टक्के शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाली आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये रूजू होताना शिक्षणं विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक (Compulsion of Covid Vaccination) केले आहे. यामुळे शिक्षकांना मुदतीत सर्व पूर्ण करावे लागणार आहे.

राज्यशासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन्ही डोस सक्तीचे करीत ५ सप्टेंबर डेडलाईन(5 September deadline for teachers vaccination) दिली आहे. यामुळे लवकरच शाळेची घंटा वाजण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here