शरदराव पवार पतसंस्थेच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप – योगेश आहेर

0
46

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ टक्के लाभांश वाटपाची सुरुवात गुरुवारी( दि २१ ) रोजी करण्यात आल्याची माहिती चेअरमन योगेश आबा आहेर यांनी दिली .

शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासद लक्ष्मीकांत आहेर यांना लाभांश देतांना चेअरमन योगेश आहेर समवेत जगदीश पवार , शरद आहेर ,बाळासाहेब मगर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना ९ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता . त्यानुसार गुरुवारी( दि २१) रोजी संस्थेचे सभासद लक्ष्मीकांत आहेर यांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लाभांश वाटपाचा शुभारंभ करण्यात आला .

यावेळी चेअरमन योगेश आबा आहेर, व्हा चेअरमन अतुल आहेर, संचालक सर्वश्री जनार्दन आहेर, शरद आहेर, बळवंत अहिरराव, कारभारी आहेर, भाऊसाहेब पगार, संजय चंदन ,जीभाऊ वाघ, प्रा सतीश ठाकरे, बाळासाहेब मगर ,अनिल आहेर, शंकर बच्छाव, रजणी वाघ,लीना आहेर ,व्यवस्थापक प्रमोद देवरे , आदींसह जगदीश पवार , महेंद्र आहेर ,सुनील आहेर,दिलीप आहेर, संतोष सूर्यवंशी , सचिन सूर्यवंशी , राजू देवरे, सतीश सूर्यवंशी ,बंडू आहेर ,दत्तू आहेर , मनोज गुजरे , रमेश जाधव, बापू आहेर ,भिला सोनवणे , योगेश आहेर , तुषार मोरे आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here