शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेचा मंगळवारी वर्धपानदिवस

0
38

देवळा प्रतिनिधी : देवळा येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेचा मंगळवारी ( दि २५) रोजी ३३ सावा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे . यानिमित्ताने संस्था कार्यालयात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे . यावेळी सभासद, ठेवीदार तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन , चेअरमन योगेश आहेर, व्हा चेअरमन अतुल आहेर व संचालक मंडळाने केले आहे . संस्थेचे एकूण १ हजार ११० सभासद आहेत.

सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे- ठेवी २३ कोटी १६ लाख, कर्जवाटप – १४ कोटी ६३ लाख, गुंतवणूक-१० कोटि ८० लाख, निव्वळ नफा -४० लाख रुपये तर भागभांडवल- ६५ लाख ,स्वनिधी -२ कोटी ९० लाख,खेळते भागभांडवल – २७ कोटी २८ लाख याप्रमाणे आहे.यावेळी संस्थापक शांताराम तात्या आहेर, ,चेअरमन योगेश आहेर ,व्हा चेअरमन अतुल आहेर,संचालक शरद आहेर, जनार्दन आहेर, बळवंत अहिरराव, कारभारी आहेर, भाऊसाहेब पगार,संजय चंदन,शंकर बच्छाव, सौ रजनी वाघ, सौ लीना आहेर, तज्ञ संचालक सतीश ठाकरे,अनिल आहेर,व्यावसापक प्रमोद देवरे आदींसह रमेश जाधव,बापू आहेर, भिला सोनवणे, मुन्ना आहेर, संदीप आहेर, तुषार मोरे कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here