शंभरी पार माजी आ. ‘जनुभाऊंना’ शरद पवारांच्या शुभेच्छा

0
41
नाशिक येथे देवळ्याचे माजी आमदार जनुभाऊ आहेर यांना शंभरी निमित्ताने शुभेच्छा देतांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार समवेत पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर ,हेमंत टकले , सरोज आहिरे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्याचे माजी आमदार जनुभाऊ आहेर यांनी नुकतीच आपली वयाची शंभरी पूर्ण केल्याने त्यांनी रविवारी (दि १४ ) रोजी नाशिक येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची आहेर यांनी भेट घेतली.

नाशिक येथे देवळ्याचे माजी आमदार जनुभाऊ आहेर यांना शंभरी निमित्ताने शुभेच्छा देतांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार समवेत पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर ,हेमंत टकले , सरोज आहिरे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

यावेळी आहेर यांना शंभरी निमित्त पवार यांनी शुभेच्छा दिल्या . माजी आमदार जनुभाऊ आहेर यांनी चांदवड देवळा मतदार संघात सण १९७२ ते ७७ म्हणून काम पाहिले आहे . श्री आहेर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते . त्यानंतर प्रदीर्घ काळ काँग्रेस मध्ये काम केले .

शरद पवार यांचे समवेत विधान सभेत काम काज केले असल्याने त्यांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे . वयाची शंभरी पूर्ण केल्यानंतर आहेर यांची इच्छा होती , की ,शरद पवार यांची भेट घ्यावी, त्यानिमित्ताने नाशिक येथील कार्यक्रमात पवार यांनी खास हॉटेल एमरॉन पार्क येथे जनुभाऊ आहेर यांना बोलावून त्यांना शतक पूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या .

यावेळी पालकमंत्री ना . छगन भुजबळ, आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर ,आमदार हेमंत टकले, माजी आमदार दीपाली चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अड रवींद्र पगार , माजी नगरसेवक उमेश आहेर आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here