व्हिडीओ कॉल करत गिरणा नदीपात्रात संपवले जीवन

0
36

देवळा प्रतिनिधी : शुक्रवारी( दि ७ ) रोजी लोहोनेर ता देवळा येथील गिरणा नदीपात्रात उडी घेऊन एका ३२ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि , शुक्रवारी दि ७ रोजी सायंकाळच्या सुमारास सुनील भगवान माळी (३२) रा तुर्कीहुडी ,उमाजी नगर ता सटाणा याने घरगुती भांडण व दारूच्या नशेत लोहोणेर येथील गिरणा नदीवरील पुलावरून उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे . माळी यांच्या पत्नीने शुक्रवारी पती सुनील माळी घरी नसल्याची तक्रार पोलिसांत दिली होती .

मात्र ,माळी याने व्हिडीओ कॉलच्या माद्यमातून आपण गिरणा पुलावरून नदीपात्रात उडी घेत असल्याचे सांगितल्याचे समजते . यावरून आज शनिवारी( दि ८) रोजी सटाणा व लोहोणेर येथील युवकांनी सुनील माळी याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला . या घटनेची देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ,अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस डी आर पवार,व्ही आर देवरे ,पाटील ,कोरडे करीत आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here